PMRDA Sector 12 Shops E Auction | सेक्टर 12 – गाळे (दुकान) ई-लिलाव
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे पेठ क्र. १२ मधील गृहयोजना क्र. १ व २ मधील उर्वरीत १६ व्यापारी दुकाने भाडेपट्टा तत्वावर वाटप करण्याकरीता माहिती पत्रकामध्ये नमूद केल्याप्रमाणे विहीत पात्रता धारण करणाऱ्या इच्छूक अर्जदारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे पेठ क्र. १२ येथील गृहयोजना क्र. १ व २ मधील उर्वरीत १६ दुकानांचे (Online) ई-लिलाव पद्धतीने ८० वर्षांच्या भाडेपट्टा तत्वावर वाटप करण्यात येणार आहे.
वाटपासाठी प्रस्तावित असलेल्या दुकानांची, इच्छुक व्यक्तींनी समक्ष पाहणी करुन सदर ई-लिलाव प्रक्रियेत सहभागी व्हावे. एकापेक्षा जास्त दुकानांकरिता अर्ज करावयाचा असल्यास प्रत्येक दुकानाकरिता स्वतंत्र अर्ज व अनामत रक्कम भरणे आवश्यक.
PMRDA Sector 12 Shops E Auction| सेक्टर 12 – गाळे (दुकान) ई-लिलाव संपूर्ण माहिती










ई-लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व पात्र व्यक्तीनी ई-लिलाव पोर्टल https://eauction.gov.in वर नोंदणी करणे सक्तीचे असून सर्व प्रकिया https://eauction.gov.in याच वेबसाईटवर राबविली जाणार आहे.
अर्जदारांना अर्ज भरताना अधिक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्यास त्यांनी 24 X 7 टोल फ्री क्रमांक ०१२०-४००१-००२ / १२०-४००१००५/०१२०-६२७७-७८७ वर संपर्क साधावा. तर दुकानाबाबत अधिक माहिती हवी असल्यास ०२०-२७१६६००० या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.
सर्व अर्जदारांनी ई-लिलाव प्रकिये संबंधी सर्व कागदपत्रे ऑनलाईनच सादर करणे आवश्यक आहे.
सदर ई-लिलाव प्रक्रियेसंबंधी सूचना सविस्तर अटी व शर्ती https://eauction.gov.in या पोर्टलवर व www.pmrda.gov.in या संकेत स्थळावर पाहण्यास उपलब्ध आहेत.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे हे दुकान वाटपाच्या कोणत्याही कामासाठी कोणालाही प्रतिनिधी / सल्ला देणार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदारांनी कोणत्याही अनधिकृत व्यक्तींशी परस्पर पैशांचा व्यवहार केल्यास त्याला पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे जबाबदार राहणार नाहीत. तसेच अर्जदारास कोणी दलाल व्यक्ती परस्पर अर्ज विक्री किंवा प्राधिकरणाच्या नांवे पैसे उकळणे किंवा फसवणूक करणे इ. बाबी करतांना आढळल्यास या कार्यालयास पुढील दुरध्वनीवर कळवावे.
दुरध्वनी क्रमांकः ०२०-२७१६६०००
पुणे PMRDA अंतर्गत सेक्टर 12 मधील गाळे (दुकान) ई-लिलाव, संपूर्ण माहिती – Download PDF