PMAY-Dudulgaon, PCMC, Pune
Pradhan Mantri Awas Yojana-Dudulgaon, PCMC, Pune
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पंतप्रधान आवास योजना डूडूळगाव 1 हजार 190 सदनिकांसाठी आपला अर्ज दाखल करा.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत डूडूळगाव येथे 1 हजार 190 सदनिका उभारण्यात येत आहेत. त्यासाठी पिंपरी चिंचवड शहरातील रहिवाशी असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील पात्र लाभार्थ्यांकडून ३० ऑगस्ट २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
प्रधान मंत्री आवास योजना–डुडूळगाव एकुण सदनिका 1,190
लाभार्थी हिस्सा प्रति सदनिका 14, 14, 173 रूपये
एकूण प्रति सदनिका किंमत रूपये 16,64, 173 रूपये
केंद्र शासन हिस्सा प्रति सदनिका – 1,5०,००० रूपये
राज्य शासन हिस्सा प्रति सदनिका – 1,००,००० रूपये
सदर प्रकल्पासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ३० ऑगस्ट २०२4 ते ३० सप्टेंबर २०२4
आवश्यक कागदपत्रे:
आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, मतदान ओळखपत्र, जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, बँक पासबुक, डोमिसाईल दाखला, लाईट बिल, २ पासपोर्ट आकाराचे फोटो.
——————————————————————————————————————-
1) नागरिकांकडुन सर्वसाधारण कागदपत्रे उदा. आधारकार्ड, पॅनकार्ड व इतर (सर्व कुंटुंबाचे) अपलोड झाल्यानंतर सदर नागरिकांकडून अर्जासोबत र.रू. १०,०००/- इतकी अनामत रक्कम व नोंदणी शुल्क र.रू.५०० असे एकूण १०,५००/- रूपये जमा करायचे आहे.
२) सदर रक्कम यशस्वीरित्या भरल्यानंतर पुढील उर्वरीत कागदपत्रे अपलोड करावयाची आहे.
3) सोडतीमध्ये ९३७ सदनिकांचे विजेता यादी असेल व प्रतिक्षा यादी १ असणार आहे.
4) सदर सोडतीमध्ये विजेता न झालेल्या व प्रतिक्षा यादीमध्ये नाव न आलेल्या नागरिकांचे अनामत रक्कम अर्ज करताना नमुद केलेल्या खात्यावर ऑनलाईन पध्दतीने र.रू. १०,०००/- परत (रिफंड) करण्यात येईल.
—————————————————————————————————————
अर्ज करण्यासाठी https://pcmc.pmay.org या संकेतस्थावर जाऊन अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्ण करावी.
अधिक माहितीसाठी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in संकेतस्थळास भेट द्या.