वास्तुशास्त्र म्हणजे काय ?
पुरातन भारतीय शास्त्रातील एक महत्त्वाचे आणि स्थापत्य शास्त्राशी निगडित असे शास्त्र म्हणजे वास्तुशास्त्र.
वास्तु शास्त्र मुख्यतः पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण या मुख्य दिशा, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य या उपदिशा आणि ब्रह्मस्थान तसेच दिशांच्या देवता त्यांचा प्रभाव आणि फल यावरही आधारित आहे. यावरून आपल्या वास्तु चे परीक्षण करता येते.
वास्तु म्हणजे केवळ चार भिंती आणि छत असलेले घर नाही, तर हे एक स्थान आहे जिथे निसर्ग,पंचतत्व अर्थात जल, अग्नी, वायू, पृथ्वी (माती), आकाश स्वरूपात वास करत असते आणि त्याची ऊर्जा प्रवाहित होते, जी आपण दररोज अनुभवतो.
वास्तुशास्त्रामध्ये फ्लॅट,लहान घरापासून ते मोठ्या महालापर्यंत, आणि छोटे दुकानांपासून ते मोठ्या कार्यालयांपर्यंत सर्व समाविष्ट आहे, कारण हे सर्व स्थान आपले व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाची क्रियावली दर्शवितात.
जर आपली वास्तु योग्य प्रकारे संतुलित (बॅलन्स) असेल, तर ते घरात सुख, शांती आणि समृद्धी आणते. परंतु, जर त्यात असंतुलन असेल, तर त्याची ऊर्जा नकारात्मक रूपाने प्रवाहित होऊ शकते, ज्यामुळे आपल्याला दुष्परिणामांचा सामना करावा लागू शकतो,
जसे की बऱ्याचदा संपूर्ण घराची, कार्यालय, दुकानांची रचना वास्तुशास्त्र नियमानुसार असते तरी पण योग्य तसे परिणाम दिसत नाहीत आणि नाहक वास्तुदोषांना सामोरे जावे लागते कारण कधी कधी अंतर्गत रचनेत सुद्धा चुका झालेल्या असतात. उदाहरणार्थ : घरातील ईशान्य भागात शक्य असताना देखील घरातील देवाचे स्थान अन्य दिशेत असणे.
घर किंवा अन्य व्यावसायिक जागा, प्रॉपर्टी घेताना वास्तुशास्त्राविषयी अधिक माहिती नसल्यामुळे अयोग्य निवड आणि पुढे नकारात्मक परिणाम.
वास्तुशास्त्रा विषयी बेसिक माहिती असूनसुद्धा काही अपरिहार्य कारणांमुळे, उदाहरणार्थ: घराच्या बांधकामात कुठले ही स्ट्रक्चरल बदल शक्य नसणे. वास्तू दोषांना सामोरे जावे लागते.
असे असले तरी अश्या सर्व अडचणींवर उत्तम वास्तु तज्ञांच्या मार्गदर्शनाने सकारात्मक परिणाम दिसून येतात. घराचे किंवा व्यावसायिक जागेचे वास्तुशास्त्र करणे म्हणजे मोठा खर्च असे अजिबात नाही, काही वेळा घर किंवा व्यावसायिक जागेची अंतर्गत रचना, काही सोपे व सहज शक्य बांधकाम करून अथवा कमी करून वास्तुशास्त्रा ला अपेक्षित रचना करू शकतो.ज्या ठिकाणी असे कुठलेच उपाय शक्य नाहीत तिथे विनातोडफोड उपायाद्वारे अर्थात भारतीय वास्तूशास्त्रात उल्लेख केलेले कॉपर यंत्र आणि पिर्यामीड माध्यमातून वास्तूशास्त्राचे सकारात्मक परिणाम अनुभवता येतात.वास्तुशास्त्राच्या सखोल अभ्यासाने निश्चितच घराचे नंदनवन होऊ शकते.
— साईश्रीरंग पापळकर
स्थापत्य अभियंता, वास्तुतज्ञ
वास्तूरंगा कन्सल्टन्सी, पिंपरी चिंचवड,पुणे.
संपर्क: 9527691890