PMRDA PMAY- Sector 12 – Bhosari, Sector 30-32 – Walhekarwadi, Nigadi, PCMC, Pune
PMRDA Pradhan Mantri Awas Yojana- Sector 12 – Bhosari, Sector 30-32 – Walhekarwadi, Nigadi, PCMC, Pune
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या पंतप्रधान आवास योजना पेठ क्र.१२ येथील ६६१ सदनिका व पेठ क्र.३०-३२ येथील ६७६ सदनिकांसाठी आपला अर्ज दाखल करा.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पेठ क्र.१२ येथील ६६१ सदनिका व पेठ क्र.३०-३२ येथील ६७६ सदनिकासाठी पात्र लाभार्थ्यांकडून १२ ऑक्टोबर २०२४ पासून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS (1 BHK) प्रवर्गातील ४७ सदनिका व LIG (२BHK) प्रवर्गातील ६१४ सदनिका आणि पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS (1RK) प्रवर्गातील ३४७ सदनिका व LIG (2 BHK) प्रवर्गातील ३२९ सदनिका अशा एकूण १३३७ शिल्लक सदनिकांच्या लॉटरीचा शुभारंभ दि. ११.१०.२०२४ रोजी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे. (भा.प्र.से), यांच्या हस्ते करण्यात आला.
इच्छुक नागरिकांना अर्ज करण्यासाठी नोंदणीची प्रक्रिया दि.११.१०.२०२४ पासून सुरु करण्यात आलेली असून सोडतीसाठी Online अर्ज करण्यास दि. १२.१०.२०२४ ते १२/११/२०२४ पर्यंत मुदत देण्यात आलेली आहे. पेठ क्र. १२ येथील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत EWS (1 BHK) प्रवर्गातील २९.५१ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत रु. १५,७४,४२४/- इतकी असून LIG (२ BHK) प्रवर्गातील ५९.२७ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत रु. ३५,५७,२००/- इतकी आहे. तर पेठ क्र. ३०-३२ येथील परवडणारी घरे योजनेअंतर्गत EWS ((RK) प्रवर्गातील २५.५२ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत रु. २०,९०,७७१/- इतकी असून LIG ( BHK) प्रवर्गातील २४.५७ चौ.मी. क्षेत्राच्या सदनिकांची किंमत रु. २८,३२,२०८/- इतकी आहे.
सोडतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करणे : ११/१०/२०२४
ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची सुरुवात: ११/१०/२०२४
सोडतीसाठी ऑनलाईन अर्जाची सुरुवात: १२/१०/२०२४
ऑनलाईन पेमेंट स्विकृती सुरुवात दिनांक: १२/१०/२०२४
सोडतीसाठी ऑनलाईन अर्जासाठी नोंदणीची शेवटची तारीख / वेळ: १२/११/२०२४
ऑनलाईन पेमेंट स्विकृती अंतिम दिनांक: १२/११/२०२४
बैंकित RTGS/NEFT द्वारे अनामत रक्कम भरण्याचा अंतिम दिनांक: १३/११/२०२४
सोडतीसाठी स्विकृत अर्जाच्या प्रारुप वादीची प्रसिध्दी: २५/११/२०२४
Objection/Suggestiob/आक्षेप घेण्याकरिता अंतिम दिनांक: २६/११/२०२४ सायं.
सोडतीसाठी स्विकृत अर्जाच्या अंतिम यादीची प्रसिध्दी: ०४/१२/२०२४
सोडत दिनांक: ०८/१२/२०२४
सोडतीमधील यशस्वी व प्रतिक्षा यादीवरील अर्जदारांची नाये PMRDA च्या संकेतस्थळावर प्रसिध्द करने ०८/१२/२०२४
नवीन घराची सुवर्णसंधी:
पेठ क्र.१२ सदनिकांची संख्या
अत्यल्प उत्पन्न गट (EWS): ४७
अल्प उत्पन्न गट (LIG): ६१४
एकूण: ६६१
पेठ क्र.३०-३२ सदनिकांची संख्या
अत्यल्प उत्पत्र गट (EWS):३४७
अल्प उत्पन्न गट (LIG): ३२९
एकूण: ६७६
नोट : प्रधानमंत्री आवास योजनेतील २.५० लाख रूपयाचे अनुदान फक्त पेठ क्र. १२ येथील EWS गटातील लाभार्थ्यांसाठी मान्यतेनुसार
सदर गृहप्रकल्पातील EWS प्रवर्गातील सदनिकांसाठी रु.५०००/- इतकी अनामत रक्कम ठेवण्यात आली असून LIG प्रवर्गातील सदनिकांसाठी रु.१०,०००/- इतकी अनामत रक्कम ठेवण्यात आलेली आहे. तसेच दोन्ही प्रवर्गासाठी GST सह फॉर्म की रु. ७०८/- ठेवण्यात आलेली आहे.
Online अर्ज भरण्याकरिता http://housing.pmrda.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, अधिक माहितीसाठी Helpline No.- ०२२६२५३१७२७.
लॉटरीची संपूर्ण प्रक्रिया ही संगणकीय प्रणालीद्वारे असल्याने यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप नाही. या सुवर्णसंधीचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ करून घ्यावा व मुदतीपूर्वी Online अर्ज सादर करावेत.