MHADA Lottery Pune 2024: पुणेकरांना गुडन्यूज! म्हाडाची 6294 घरांची लॉटरी निघाली आजच आपला अर्ज दाखल करा.
आपल्या हक्काचं घर असावं, अशी अनेकांची इच्छा असते. मात्र घरांच्या वाढत्या किंमती पाहता घर घेणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं झालं आहे. पण आता स्वस्तात हक्काचं घर पाहणाऱ्या अनेकांचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. (MHADA) म्हाडाने आता मुंबईनंतर Pune विभागात घरांची सोडत जाहीर केली आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे Pune, Pimpri-Chinchwad, PMRDA सह Solapur, Kolhapur, व Sangli जिल्ह्यातील विविध गृहनिर्माण योजनेतील 6 हजार 294 सदनिकांची lottery जाहीर केली आहे. ही pune mhada lottery 2024 ऑनलाईन पद्धतीने आहे. यासाठी 10 ऑक्टोबर 2024 रोजी दुपारी 12 वाजेपासून अर्ज नोंदणी व अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. ही प्रक्रीया 12 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंतच आहे. तर mhada lottery 2024 pune ऑनलाईन संगणकीय सोडत 5 डिसेंबर, 2024 रोजी होईल. नोंदणीकृत अर्जदार 10 ऑक्टोबर, 2024 रोजी 12 वाजेपासूनच pune mhada lottery 2024 साठी ऑनलाइन पेमेंट देखील करू शकणार आहेत. 12 नोव्हेंबर, 2024 रोजी रात्री 11.59 पर्यन्त अर्जदार ऑनलाइन अनामत रक्कमेच भरणा करून शकतील. सोडतीसाठी स्वीकृत अर्जांच्या प्रारूप यादीची प्रसिद्धी 23 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता (MHADA) म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या आधिकृत संकेतस्थावर प्रसिद्ध होईल. mhada lottery 2024 pune या सोडतीसाठी 13 नोव्हेंबर,2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत संबंधित बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत RTGS / NEFT द्वारे अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येईल. त्यानंतर 27 नोव्हेंबर, 2024 रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्जदारांना प्रारूप यादीवर आपल्या हरकती नोंदविता येणार आहेत.
त्यानंतर 30 नोव्हेंबर रोजी अर्जांची यादी (MHADA) म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या संकेत स्थळावर प्रसिद्ध केली जाईल. यामध्ये (MHADA) म्हाडा गृहनिर्माण योजनेतील प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या योजनेअंतर्गत 2340 सदनिका विक्रीसाठी सोडतीत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच (MHADA) म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत 93 सदनिका, (PMAY)प्रधानमंत्री आवास योजनेतील 418 सदनिका प्रथम येणार्यास प्रथम प्राधान्य तत्वावर नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत Pune Municipal Corporation (पुणे महानगरपालिका), Pimpri-Chinchwad Municipal Corporation (पिंपरी-चिंचवड महानगरपालिका), Pune Metropolitan Region Development Authority (PMRDA) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हद्दीतील एकूण 3312 सदनिकांचा समावेश आहे. तसेच 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील 131 सदनिकांचा समावेश आहे.
अर्ज नोंदणी व अर्ज भरणा करण्याआधी First Come First Serve- mhada lottery 2024 pune advertisement या माहिती पुस्तिकेचे अवलोकन करावे. First Come First Serve- mhada lottery 2024 pune advertisement ही पुस्तिका https://housing.mhada.gov.in या (MHADA) म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर इच्छूक अर्जदारांकरिता उपलब्ध करून देण्यात आली आहे. दरम्यान, नोंदणीसाठी इच्छुक अर्जदारांनी (MHADA) म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. ( https://housing.mhada.gov.in ) तसेच सदनिकांच्या वितरणासाठी (MHADA) म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार व प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही, त्यामुळे कोणत्याही अशा व्यक्तीशी परस्पर व्यवहार करू नये, असे अवाहन देखील (MHADA) म्हाडाने केले आहे.