Download Index 2 online in Maharashtra
How to Download Index 2 online in Maharashtra : Your Complete Guide
तुम्ही जर नुकतेच तुमच्या नवीन property चे registration केले असेल तर तुम्ही खालील दिलेली माहिती लक्ष पूर्वक वाचा म्हणजे तुम्हाला Index 2 कसे download करायचे ते समजेल.
तुम्ही जेंव्हा तुमच्या property चे registration / खरेदी करता त्यावेळेस तुम्हाला सरकारला stamp duty & registration charges चे पैसे भरावे लागतात आणि ते भरले कि तुमच्या Phone मध्ये तुम्हाला MHGRAS कडून मेसेज आला असेल त्यामध्ये तुम्हाला GRN Number, AMT, DIST, DEPT, BANK हि सर्व माहिती दिली असेल. (तुम्हाला जर मेसेज phone मध्ये मिळत नसेल किंवा खूप दिवसपूर्व मेसेज आला असेल तर तुम्ही Phone मध्ये Message मध्ये जाऊन वरती Search मध्ये MHGRAS हे type करून शोधू शकता तुम्हाला मेसेज मिळेल.)
सर्वात प्रथम तुम्हाला Index 2 download करण्यापूर्वी Challan download करावे लागेल कारण Index 2 download करण्यासाठी तुम्हाला जी माहिती हवी आहे ती Challan download केल्यावर मिळेल म्हणून आदी Challan download करायचे व नंतर Index2 download करता येते.
Challan व Index2 कसे डाउनलोड करायचे ते तुम्हाला step by step खाली सांगितले आहे ते काळजीपूर्वक वाचून त्याप्रमाणे index2 download करा.
STEP 1: खालील लिंक वर जावून Challan download करावे, जे काही डिटेल्स लागतील ते सर्व तुम्हाला MHGRAS कडून आलेल्या मेसेज मध्ये असतील.
STEP 2: https://gras.mahakosh.gov.in/echallan/challan/views/frmSearchChallanWithOutReg.php या साईट वर जावून Department, District/Treasury, Amount, BANK हि सर्व माहिती भरावी. (तुम्हाला Phone मध्ये MHGRAS कडून मेसेज आला असेल त्यामध्ये GRN Number, AMT, DIST, DEPT, BANK हि सर्व माहिती दिली असेल.)
STEP 3: जर तुमच्या challan मध्ये defaced असा लाल रंगाचा शिक्का असेल तरच तुम्हाला त्यावर डॉक्युमेंट नंबर भेटेल , जर defaced असा लाल शिक्का नसेल तर तुम्हाला Index2 download करता येणार नाही , थोड्या दिवसांत पुन्हा challan download करून चेक करावे लागेल.
STEP 4: Defaced cha शिक्का आहे त्यांनी
Challan मध्ये एकदम शेवटी (remarks मध्ये) एक लाईन असेल HVL*–*-2023 (दुय्यम निबंधक/SRO, दस्त क्रमांक/Doc.No , तुमच्या खरेदीचे वर्ष )
पहिला * मध्ये तुम्हाला तुमचा दुय्यम निबंधक/SRO असेल
दुसरा * हा तुमचा दस्त क्रमांक/Doc.No.असेल
STEP 5: https://freesearchigrservice.maharashtra.gov.in/
या साईट वर जावून दस्त निहाय/Document Number वर click करावे
STEP 6: Select Registration Type / नोंदणी प्रकार निवडा : isarita2.0 निवडा
STEP 7: जिल्हा/District: पुणे (तुमच्या जिल्ह्याचे नाव टाका )
STEP 8: दुय्यम निबंधक/SRO जो challan वर भेटला तो(पहिला *) टाका
STEP 9: दस्त क्रमांक/Doc.No. (दुसरा *) टाका
STEP 10: वर्ष/Year: (तुमच्या खरेदीचे वर्ष ) टाका
STEP 11: Capcha Code दिलेला आहे तो आहे तसाच टाका
STEP 12: Search/शोध वर क्लिक करा तुमचा Index2 ओपन होईल.
STEP 13: Index2 ओपन झाल्यावर IndexII या वर क्लिक करून Index2 download करा .

